राज्य मंडळाच्या शाळांना उन्हाळी सुट्ट्या

 सध्याच्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सरकारने सरकारी मंडळाच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला यावर्षी दरवर्षीपेक्षा अगोदरच सरकारने शाळांना सुट्ट्या देण्याचा निर्णय घेतलेला आहे .याचे कारण म्हणजे वाढती तापमान वाढ व त्यातून निर्माण होणाऱ्या उष्माघातासारख्या गंभीर समस्या दरवर्षी सरकारी मंडळाच्या शाळांना उन्हाळी सुट्टी मे मध्ये जाहीर करते पण यावर्षी वाढत्या उष्णतेमुळे  एप्रिलमध्येच शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केल्या. 

वाढत्या तापमानाच्या अनेक घटना आपण या अगोदर पाहिलेले आहेत महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात देखील वाढत्या तापमानामुळे अनेकांना समस्या निर्माण झाल्या .अनेक घटना अलीकडेच राज्यामध्ये उष्माघाताच्या देखील आढळून आल्या याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता शाळांना सुट्ट्या घोषित करण्याचे ठरवले आहे .यावर पत्रकारांशी बोलताना दीपक केसरकर ,यांनी देखील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रश्न उपस्थित केले आणि सुट्ट्या जाहीर केल्या. 

कालपासूनच राज्यामध्ये सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. दरवर्षी उन्हाळी सुट्ट्या ह्या मे महिन्याच्या सुरुवातीला लागतात. पण यावर्षी वाढत्या उन्हाचा कडाका मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे उन्हाळी सुट्ट्या अगोदरच म्हणजे एप्रिल मध्येच शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केल्या राज्यातील शाळांच्या सुट्ट्या ह्या आता 15 जून पर्यंत असणार आहेत. व विदर्भातील शाळांना वाढत्या उष्णतेमुळे जास्त फटका बसतो त्यामुळे तेथील शाळा या 30 जून रोजी सुरू होतील. असे देखील शिक्षण मंत्र्यांनी सांगितले. वारंवार सध्या बदलत्या वातावरणाचे परिणाम सर्वसामान्यांना भोगावे लागत आहेत .त्यामुळे सर्वसामान्यांनी देखील उष्णतेपासून स्वतःची खबरदारी घ्यावी असे देखील शिक्षण मंत्र्यांनी सांगितले सध्या राज्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस देखील पडत आहे. परंतु तापमान कमी होण्याचे नाव घेत नाही आहे नागपूर सारख्या ठिकाणी तर तापमान वाढ खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे त्यामुळे उष्णतेच्या झळा देखील सर्वसामान्यांना भोगावे लागत आहेत. तर कुठे अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे कुठे वादळी वाऱ्यासह पाऊस देखील पडत आहे. विद्यार्थ्यांबाबत कुठल्याही उष्णते बाबतीत समस्या निर्माण होऊ नये.याकरिता राज्य सरकारने यावर्षी शाळांना लवकरच सुट्ट्या द्यायचा निर्णय घेतलेला आहे. 

शिक्षण मंत्र्यांनी बोलताना विद्यार्थ्यांना विनंती देखील केली की सध्याचा उन्हाळा हा वेगळ्या प्रकारचा आहे .बाहेर खेळत असताना देखील या उन्हाची काळजी घ्या असा सल्ला देखील शिक्षण मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिलेला आहे. 

सध्या वाढत्या उन्हाच्या तापमानामुळे उष्माघाताच्या घटना देखील घडण्या च्या शक्यता आहे. त्यामुळे लहान मुलांनी मोठ्या व्यक्तींनी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी नोकरदार वर्गांनी महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतलेली पाहिजे. 

या या अगोदर राज्यामध्ये हवामान बदलाचे संकेत देखील मोठ्या प्रमाणावर दिसत होते पण हवामान बदल होत असतानाच मोठ्या प्रमाणावर उष्णतेचा कडाका हा सर्वसामान्यांना जाणवत आहे. .त्यामुळे सर्वसामान्यांनी काळजी देखील मोठ्या प्रमाणावर घेणे आवश्यक आहे .शक्यतो लहान मुलांनी आणि वयस्कर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर काळजी घेणे गरजेचे आहे नाहीतर यामधून उष्माघात सारख्या गंभीर समस्येचा सामना देखील सामना करावा लागतो. 

उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी काही खबरदारीचे उपाय

 लहान मुलांनी स्वतःचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी शक्यतो उन्हात फिरणे खेळणे टाळावे पालकांनी मुलांना खेळण्यासाठी सकाळचा किंवा संध्याकाळचा वेळ उपलब्ध करून द्यावा. 
सर्व वाढत्या उष्णतेमुळे समस्या निर्माण होऊ नये म्हणून भरपूर पाणी प्यायला द्यावे. 
लहान मुलांना उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून थंड पेय देखील प्यायला द्यायला हवी. उदाहरणार्थ ताक दही मठ्ठा यासारखे पेय. 

लहान मुलांना आहार देखील हलका द्यावा खायला विविध प्रकारची फळे द्यावी. उदाहरणार्थ टरबूज, खरबूज ,पपई यासारखी रसयुक्त फळे ज्यामुळे लहान मुलांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित राहील व उष्णते मुळे होणारे त्रासहे मुलांना कमी प्रमाणात होतील. 

जेवतेजेवते वेळेस बाजरीच्या भाकरीवर जास्त भर द्यावा त्याचबरोबर रसयुक्त भाज्या फळे खाण्यासाठी उपलब्ध करून द्यावीत. 

शक्यतो उन्हामध्ये बाहेर जाते वेळेस मुलांना मोठा रुमाल उपलब्ध करून द्यावा त्यामुळे त्यांचे उष्णतेपासून संरक्षण होईल. 

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा शासनाशी संबंधित वेबसाईट नाही. कृपया याला ऑफिशियल वेबसाईट म्हणून मानू नका आणि कमेंट मध्ये आपला मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संबंधित तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाहीत.आम्ही आमच्या सर्व अभ्या गताना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

Previous Post Next Post